बीडमध्ये हवाला व्यवहारप्रकरणी तीन ठिकाणी छापे

२६ लाखांची रोकड जप्त
Beed city hawala raids
हवाला व्यवहारप्रकरणी तीन ठिकाणी छापे
Published on
Updated on

बीड : शहरात मोठ्या प्रमाणात हवाला व्यवहार सुरू असून मोठी आर्थिक उलाढाल यामार्फत होत असते, अशी माहिती सुत्रांकडून बीड पोलिसांना मिळाली. त्यानंतर अशा व्यवहारांना चाप बसावा, म्हणून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने बुधवारी (दि.२५) हवाला व्यवहारप्रकरणी तीन ठिकाणी छापे टाकले. यामध्ये पहिला छापा कबाड गल्लीमध्ये, दुसरा छापा सारडा कॅपिटल येथे, तर तिसरा छापा जालना रोड येथील वीर हॉस्पिटलच्या बाजूला एका ठिकाणी टाकण्यात आला. तिन्ही ठिकाणाहून एकूण २६ लाख रुपये जप्त केले असून हे पैसे कुठून आले, याची सखोल चौकशी बीड शहर पोलीस करत आहेत.

Beed city hawala raids
Breaking ! मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे

पैशाची कुठलीही खात्रीशीर सुरक्षितता नसताना यामध्ये काही गैरव्यवहार झाला किंवा पैशांची चोरी झाली, याबद्दल सुरक्षा नसताना अशा प्रकारचे व्यवहार होत आहेत यामुळे शासनाचा महसूल बुडवण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी हा छापा हा महत्त्वाचा होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, बाबा राठोड, पोलीस उपनिरीक्षक काकरवाल, कुकलारे, राठोड, शेख, निर्धार म्हेत्रे कांबळे, परजणे, शिरसाठ यांनी केली.

Beed city hawala raids
शरद पवारांचा हल्लाबोल : तपास यंत्रणा छापे टाकतात, खुलासा भाजप नेते करतात!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news