किनवट पुढारी वृत्तसेवा : भुलजा नियतक्षेत्रात शुक्रवारी रात्री गस्त घालीत असतांना वनपथकाने चार सागी तस्करांना ताब्यात घेतले. तसेच बेकायदेशीरित्या तोडलेले सागवान झाडेही जप्त करण्यात आली.
बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. पोतुलवार हे शुक्रवारी (दि.२०) रात्री नियतक्षेत्र भुलजाच्या जंगलभागात रात्रीला गस्तीवर होते. दरम्यान, पाच वनतस्कर सागी झाडे तोडतांना दिसली. त्यांनी लगेच उपवनसंरक्षक केशव वाबळे व रोहयो व वन्यजीवचे वनसंरक्षक श्रीकांत इटलोड, वनपाल गंगाधर निलपत्रेवार, वनरक्षक जी. एस. देवकांबळे, जी. पी. काळे, के. जी. माळी यांना बोलावून
सापळा रचून चार सागी तस्करांना रंगेहाथ पकडले. मात्र पाचवा अंधारात पसार झाला. परंतु दुसरे दिवशी त्यालाही अटक करण्यात आली. प्रकाश मारोती सिडाम, माणिक माधव सिडाम, मारोती नागनाथ दराडे, राज नागनाथ गेडाम आणि विजय संजय गीते अशी तस्करांची नावे आहेत. साध ारणतः १५ हजार ५६८ रुपये किमतीचे सागवान झाडाचे लढे व दोन मोठ्या करवती जप्त करण्यात आल्या. या
कारवाईत वनपाल शेख याकुब, वनपाल एस. एल. ढगे, वनपाल के. एम. बडूरे, डी. एन. गड्डे, एन. के. सुरनर, ए. एन. रंगे, एस. आर. वट्टमवार, के. एस. तलांडे, एन.पी. कोरडे, ए. टी. मधीकर, पी. डी. सोनुने, ए. ए. सपकाळ, कु. ए. एम. देशमुखे, कु. दुर्गा ढालके, सौ. सुजाता देवापुरे यांनी सहभाग घेतला. तस्करांना न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.