औरंगाबाद : लष्करी जवानाची छावणीत आत्महत्या, मैदानातील झाडाला घेतला गळफास

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : लष्करी जवानाने छावणीतील मैदानावरील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. जवान रात्री सहकाऱ्यांसोबत हसत-खेळत जेवण करुन झोपी गेले होते. रविवारी पहाटे साडेपाच वाजता मैदानावर अन्य जवान आले तेव्हा आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मैदानावरील झाडाला लष्करी जवानाचा मृतदेह लटकल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
अधिक वाचा –
- संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची रणनिती
- संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार!
मल्हार वन्नन राममुर्ती (वय-२६, रा. कृष्णगिरी, तामिळनाडू) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अस्पष्ट आहे. राममूर्ती हे पाच वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी ते औरंगाबादेतील छावणीत दाखल झाले होते.
अधिक वाचा –

हसत खेळत झोपी गेले …
अविवाहित असलेले राममूर्ती हे मित्रांसोबत राहत होते. शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी जेवन केले. तेव्हा त्यांनी अगदी हसत खेळत गप्पादेखील मारल्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे ते झोपी गेले.
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सरावासाठी अधिकारी आणि जवान मैदानावर जाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा राममूर्ती हे १६९ ऑफिसर मेसच्या बाजूच्या बरॅकजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना सुभेदार पोपट जाधव व इतरांनी तत्काळ फासावरुन उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आठ वाजून ५५ मिनिटांनी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अधिक वाचा –
दुपारी लष्करातील इतर जवान, अधिकारी घाटी रुग्णालयात दाखल झाले होते. शवविव्छेदन झाल्यानंतर लष्कराने पार्थीव ताब्यात घेऊन कृष्णगिरीकडे रवाना झाले. या प्रकरणी छावणी ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. छावणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहाय्यक फौजदार भगवान वाघ अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
- सातारा : रोजलॅन्ड स्कूलमधील तिघा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा
- सातारा : रोजलॅन्ड स्कूलमधील तिघा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा
- नंदुरबार अपघात : प्रवाशांसह क्रुझर दरीत कोसळून ८ जागीच ठार
पाहा व्हिडिओ –