पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनचा संसर्ग - पुढारी

पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनचा संसर्ग

बीड : माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे तपासणी केली असता कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान याला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे चाचणी केली असता या चाचणीत त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. यानंतर त्यांनी सर्वांनी काळजी घ्यावी असे नमूद केले आहे.

Back to top button