औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजाने आज (दि.१४) औंढा नागनाथ तालुका बंदची हाक दिली होती. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला समर्थन म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान औंढा नागनाथ येथे सकाळपासूनच सर्वच व्यापारी वर्गांने सहकार्य करत आपले दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या या बंदला आपला पाठिंबा दर्शविला.
औंढा नागनाथ येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तर हॉटेल, टपऱ्या चालकांनी बंद मध्ये सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनी दुकाने व हॉटेल्स बंद ठेवली. तर या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दुपारी तीननंतर काही दुकानदारांनी आपली दुकाने चालू करून लोकांची होणारी तारांबळ थांबविली.
हेही वाचा