गेवराई पोलिसांनी पकडल्या एकाच नंबरच्या आठ रिक्षा | पुढारी

गेवराई पोलिसांनी पकडल्या एकाच नंबरच्या आठ रिक्षा

गेवराई : पुढारी वृत्तसेवा

गेवराई शहरातील रस्त्यावर धावत असणाऱ्या एका नंबरच्या आठ रिक्षांवर गेवराई पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना ताब्यात घेतले. शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या आठ रिक्षा धावत होत्या. याची माहिती कोणालाही नव्हती.

विशेष म्हणजे रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचे दिसून आले. परंतु डीपी पथकाच्या धडक कारवाईत अनेक गुन्हे उघड होत असून त्यांनी केलेल्या या कारवाईत (एमएच-23,टीआर-311) क्रमांकाच्या आठही रिक्षा पकडण्यात आल्या. आठही रिक्षा गेवराई पोलिस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. एकाच नंबरच्या आठही रिक्षा मालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई डीपी पथकाचे प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाय, पोलिस नाईक नवनाथ गोरे यांनी केली.

हेही वाचलं का?

Back to top button