पीक विमा : बळीराजा पीक विम्यापासून वंचित का? : गुट्टेंचा कृषिमंत्र्यांना सवाल | पुढारी

पीक विमा : बळीराजा पीक विम्यापासून वंचित का? : गुट्टेंचा कृषिमंत्र्यांना सवाल

परभणी (गंगाखेड); पुढारी वृत्तसेवा

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० मधील खरीप हंगामाचा थकीत पीक विमा देण्याची मागणी केली.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड व पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० चा सोयाबीन व तूर या पिकांचा मंजूर असलेला पिक विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अन्यायचं झाला आहे. जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या बळीराजाला त्याच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही आ. गुट्टे यांनी या पत्रातून उपस्थित केला.

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी मंडळातील ६४९७.१४ हे. क्षेत्राकरिता १३ कोटी ३८ लाख ४४ हजार ८६२ रुपये व सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळातील ३११७.७५ हे. क्षेत्राकरिता ६ कोटी ५८ हजार ८१५ रुपयांचा सोयाबीन या पिकांचा मंजूर असलेला पीक विमा आणि गंगाखेड तालुक्यातील ४३२४.७८ हे. क्षेत्राकरिता ११ कोटी ५१ लाख ९९ हजार २०१ रुपयांचा पीक विमा व पालम तालुक्यातील ६४६६.६ हे. क्षेत्राकरिता १८ कोटी ७७ लाख ७८ हजार ९२३ रुपयांचा तूर या पिकाचा मंजूर असलेला पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही.

सोयाबीन व तूर या पिकांचा एकूण ५० कोटी २६ लाख २३ हजार ८०४ रुपयांचा मंजूर असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button