गंगाखेड : निलंबनच्या भीतीने महिला वाहकाची तब्येत बिघडली | पुढारी

गंगाखेड : निलंबनच्या भीतीने महिला वाहकाची तब्येत बिघडली

गंगाखेड (परभणी); पुढारी वृत्तसेवा

निलंबनाच्या भितीने येथील महिला वाहक सुलोचना गिरी (बॅच क्रमांक-२१५१४) यांची आज (दि.19) रोजी तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने केलेल्या एसटी कर्मचारी निलंबनाच्या यादीत आपले नाव असल्याची भिती गिरी यांना होती. याचा मानसिक तणाव आल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडल्याची चर्चा आहे.

२८ ऑक्टोबरपासून एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्यात कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेकजण आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करायला सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. सध्या गिरी यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Back to top button