जवळाबाजार(हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : परभणी ते हिंगोली मार्गावर सतरामैल परिसरात धरणाचा अरूंद पुल पुरातन काळातील दगडाचा बांधकाम केले आहे. या मार्गावर रुंदीकरण झाले पण लोकप्रतिनिधीकडून पुलाचे रुंदीकरणाबाबत दखल घेतली नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन्ही बाजूस गतिरोधकही बसविण्यात आले नाहीत. प्रशासनाचा ढिसाळ कारभारामूळे एका महिन्यात दोन अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये २ जणांनी जीव गमावाला आहे. तर दररोजच किरकोळ अपघातच्या घटना सुरूच आहेत.
परभणी- हिंगोली मार्गावर बाराशिव ते जवळाबाजार दरम्यान धरणाचे पाण्याचा कॅनाल गेलेला असून या कॅनाल वर पुरातन काळातील दगडाचा बांधकाम केलेला पुल आहे. हट्टा ते नागेशवाडी दरम्यान या रस्त्यावर रुंदीकरण करून पुलाचे रुंदीकरण बांधकाम करण्यात आले आहे.
बाराशिव ते जवळाबाजार दरम्यान सतरामैल परिसरात पुलाचे रुंदीकरण करण्यात आले नाही. या मार्गावर वाहानाची वर्दळ कायम असते. कोल्हापूर, सोलापूर, लातूर, परळी वैजनाथ, अकोला, अमरावती , नागपूर, भंडारा तर या मार्गावरील खाजगी ट्रॅव्हल दररोज ये-जा करतात. पुणे-मुंबई जाण्यासाठी पाथरी नगर मार्गाने कमी अंतर असल्याने वाहानाची वर्दळ राहते. सदरील सतरामैल पुल परभणी व हिंगोली लोकसभा मतदारसंघातुन जातो व वसमत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील हा मार्ग आहे. पण या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधीकडून दखल घेतली जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुध्दा सदरील पुलाचा दोन्ही बाजूस गतिरोधक बसविण्यास टाळा टाळ करण्यात येत आहे.
या गंभीर प्रश्न कडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. सोमवारी रात्री जवळपास 1-2 तास वाहातूक बंद झाल्याने दोन्ही बाजूस वहानांच्या लांबच लांग रांगा लागल्या होत्या. वाढते अपघात आणि पुलाचे रुंदीकरण व गतिरोधक बसविण्याची मागणी प्रवाश्यांनी केली आहेत तसेच याला कोण वाली आहे का, अजून किती लोकांचे जीव लोकप्रतिनीधी व प्रशासन घेणार आहे, असा सवाल नागरीकांनी केला आहे.
.हेही वाचा