औरंगाबाद : पैठण-पाचोड मार्गावर भीषण अपघात, एक ठार - पुढारी

औरंगाबाद : पैठण-पाचोड मार्गावर भीषण अपघात, एक ठार

पैठण : पुढारी वृत्तसेवा

पैठण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाचोड पैठण रोडवरील कॅनलजवळ आज (दि. २७) दोन ट्रकचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. मृत चालकाचे नाव मोहनलाल मिश्रीम फूलवारी (वय ३२, रा. गांधीधाम भारतनगर, गुजरात) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण-पाचोड रोडवरील कॅनलजवळ बुधवार दि. २७ रोजी साडेचार वाजता अहमदनगरहून पाचोडला जाणाऱ्या आयशर (क्र. एमएच सी.सी. ९९२१) व पाचोड मार्गे पैठणकडे येणाऱ्या ट्रकची (क्र. जीजे. १२ बी. वाय. ०१७८) या दोन्ही वाहनांचा समोरासमोर विचित्र अपघात झाला. यात चालक ट्रकमध्ये अडकल्यामुळे जागीच ठार झाला.

पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना या अपघाताची माहिती मिळात त्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकमध्ये अडकलेल्या चालक मोहनलाल मिश्रीम फूलवारी याला जेसीबी मशिनच्या मदतीने बाहेर काढले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र रावसाहेब सुळे (वय २३, रा. खेड, ता. कर्जत जि. अहमदनगर) याला पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. काही काळ वाहतूक बंद झाली होती. अपघात प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करीत आहे.

Back to top button