पुढारी ऑनलाईन डेस्क : बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. "झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८ लोक जखमी आहेत. मी आयजी आणि कलेक्टर यांच्याशी बोललो आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले."
"मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न अधिकारी करत आहेत. अपघातनंतर घटनास्थळी यंत्रणा पोहचल्या पण गाडीने पेट घेतल्याने मदत करता आली नाही, असेही शिंदे यांनी सांगतले."
समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. आधी ही बस डिव्हाइडरला धडकली. नंतर लोखंडी पोलवर आदळून बस उलटली. त्यानंतर बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. अधिकतर प्रवासी यवतमा, वर्धा, नागपूर येथील होते. अपघातानंतर ८ प्रवासी खिडकीच्या काचा फोडून बाहेर आल्याने सुखरूप वाचले. घटनास्थळी पोलिस पथक तातडीने दाखल झाले आहेत.
हेही वाचा :