तोंडोळी प्रकरण : चार दिवसांपासून बिडकीन पोलिसांचा खडा पहारा | पुढारी

तोंडोळी प्रकरण : चार दिवसांपासून बिडकीन पोलिसांचा खडा पहारा

बिडकीन ; पुढारी वृत्‍तसेवा :

पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत मंत्री, विरोधी पक्ष नेते आणि महिला आयोगाने घटनास्थळी भेट दिली. त्यामुळे गुन्ह्याची पूर्णपणे उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. गेली चार दिवस बिडकीन पोलीस तपास कामात अथक परिश्रम घेत आहेत.

तोंडोळी येथील घटना समोर येताच खुद्द पोलीस अधीक्षक निमित गोयल पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. पहिल्या दिवशी त्यांनी मुक्काम सुद्धा बिडकीनलाच केला. तसेच यांच्यासोबत, उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल नेहुल, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस हेही मुक्कामी होते.  जिल्ह्यातील व मराठवाड्यातील इतर आलेले अधिकारी सुद्धा पोलीस ठाण्यात बसून घटनेचा आढावा घेत, आपल्या पथकांना सूचना देत होते.

दुसरीकडे राजकीय नेत्यांचे सुद्धा एका-मागून एक दौरे सुरूच आहेत. अशावेळी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक आणि कर्मचारी बंदोबस्तापासून तर तपास कामासाठी गेली चार दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button