जालन्यात शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू ; दोन सख्ख्या भावांचा समावेश | पुढारी

जालन्यात शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू ; दोन सख्ख्या भावांचा समावेश

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना तालुक्यातील सामनगाव शिवारात असलेल्या एका शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा आणि बाप लेकाचा असा एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.६) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे सामनगावात शोककळा पसरली आहे.

जालना- अंबड रस्त्यावरील तसेच जालना शहरापासून दहा अंतरावरील सामनगावालगत पडुळ यांचे शेततळे जालना- अंबड रस्त्यावरील तसेच जालना शहरापासून दहा अंतरावरील -सामनगावालगत पडुळ यांचे शेततळे आहे. दुपारच्या सुमारास भागवत कृष्णा पडूळ (९), ओंकार कृष्णा पडूळ (७) आणि युवराज भागवत इंगळे (६) हे या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिन्ही मुले शेततळ्यात पडल्यानंतर आरडा ओरड सुरू झाली. युवराजचे वडील भागवत जगन्नाथ इंगळे (३५) तेथून जवळच होते. त्यांनी तळ्यात उतरून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, शेततळे एका बाजूने तळेही रिकामे करण्याचेही काम सुरू करण्यात आले, पण तोपर्यंत मृतदेह हाती लागले होते. भागवत पडुळ यांना कृष्णा आणि ओंकार ही दोनच मुले होती.

सालगडीही दगावला

भागवत जगन्नाथ इंगळे हे पडुळ यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांना एकूण चार आपत्ये. त्यापैकी युवराज होता. दरम्यान, तालुका पोलिस आणि परिसरातील लोकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले.

Back to top button