बीड : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न - पुढारी

बीड : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड; पुढारी वृत्तसेवा

छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना गुंदावडगाव येथे घडली आहे. संबंधित मुलीवर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

गुंदा वडगाव येथील नववी वर्गात शिक्षण घेणार्‍या एका मुलीची गावातीलच मुलगा छेडछाड करत होता. सततच्या या छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मुलीस उपचारासाठी बीड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मुलीचा जबाब घेण्यासाठी पिंपळनेरचे पोलीस दाखल झाले होते.

Back to top button