केज (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा – केज-मांजरसुंबा मार्गावर सारणी (सांगवी, तालुका केज पाटीजवळ) टिप्परने मोटारसायकलला धडक दिली. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक भागवत महादेव तांदळे (वय ४५, रा. अंबिलवडगाव, ता. जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी महानंदा तांदळे यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात दि १ जून रोजी सकाळी ११:३० वाजता झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, शमीम पाशा आणि संभुदेव दराडे हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे. जखमी महिलेला उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.