अन् पोलिसांचा संशय ठरला खरा, विलासचा बापानेच केला खून | पुढारी

अन् पोलिसांचा संशय ठरला खरा, विलासचा बापानेच केला खून

गौतम बचुटे/केज ; पुढारी वृत्‍तसेवा :

केज तालुक्यातील दैठणा येथे एका (३८ वर्षीय) तरुणांचा खून झाला होता. हा खून एखाद्या अज्ञात व्यक्‍तीने केल्‍याचे बोलले जात होते. मात्र या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या बारा तासांच्या आत जलदगतीने तपास करून साळसूदपणाचा आव आणणाऱ्या बापाला ताब्यात घेतले. त्‍याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत त्‍याने पोटच्या पोराचा खून केल्‍याची कबुली दिली. यावरून विलासचा बापानेच खून केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

प्रेत स्मशानभूमी कडेच्या खड्ड्यात टाकल्याची खळबळजनक घटना

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २० ऑक्टोबर बुधवार रोजी केज तालुक्यातील दैठणा येथे विलास चंद्रकांत मुळे या विवाहित तरुणांचा अज्ञात व्यतीने अज्ञात कारणासाठी खून करून त्‍याचे प्रेत स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात टाकल्याची खळबळजनक घटना घडली होती.

या विषयी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पुढे हा खून कुणी केला याचा तपास लावणे अवघाड काम होते. कारण मृत विलास हा जरी दारू पिण्याच्या सवयीचा होता; तरी त्याचे गावात कुणाशी भांडण नव्हते किंवा इतर काही कारणावरुन कुणाशी दुष्मनी नव्हती. त्यामुळे त्याचा खून कुणी केला? याचा तपास करणे पोलिसांसमोर कठीण होते.

दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सविता नेरकर, केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच श्वान पथकाची देखील मदत घेण्याचा प्रयत्न केला होता.

रोहित शर्मा याची टी-20 संघाच्या कर्णधारपदी वर्ल्डकपनंतर निवड ?

दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी प्रेताचे शवविच्छेदन झाल्यावर प्रेत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. विलासच्या प्रेतावर अंत्यसंस्कार होताच त्याच्या खून प्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्याचा बाप चंद्रकांत उद्धव मुळे (वय ६० वर्ष) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्‍याकडे अधिक चौकशी करून पोलिसी खाक्‍या दाखवला असता त्‍याने आपल्‍या मुलाचा खून केल्‍याची कबुली दिली.

Brazil : ‘या’ गावातील सुंदर मुलींना लग्नासाठी मिळेनात मुले…

अ‍ॅनिमिया आणि होमिओपॅथिक उपचार

व्हेरिकोज व्हेन्स ची समस्या

कंबरदुखी चा त्रास

पचनशक्‍ती मंदावलीय ?

बिग बॉस च्या घरातील आतापर्यंतच्या या आहेत हॉट अभिनेत्री

Back to top button