जायकवाडी धरणातून ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग | पुढारी

जायकवाडी धरणातून ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

पैठण : पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्यातील ३५ ००० हेक्टर ओलिताखालील क्षेत्रफळ असलेल्या शेतीसह औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यातील व परळी येथील वीज निर्मिती केंद्र औद्योगिक वसाहतीला संजीवनी ठरलेल्या. जायकवाडी धरणाची एकूण लांबी ६० किलोमीटरची आणि दहा किलो मीटर रुंदी असून या धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणी साठ्याची शमता आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी मातीचे धरण म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरण सलग तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरण्याचा विक्रम केला आहे. मंगळवारी रोजी सातव्या दिवशी गोदावरी नदीत ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू असून मंगळवारी रात्री धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ७० हजार ६६३ क्युसेक सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

सध्या पैठण येथील जायकवाडी धरणात पाणीसाठा २१६६. १५९ दलघमी उपलब्ध असून ९९.९८ टक्केवारी नोंद झाली. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर घरामध्ये अडकून पडलेल्या पर्यटकासाठी पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केल्यामुळे धरण पहाण्याची मोठी संधी मिळाल्यामुळे मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धरणावरती गर्दी केली असून पोलिस प्रशासनासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी विशेष बंदोबस्तासाठी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येथील धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी जास्त होत असून आज मंगळवारी रोजी रात्री ७० हजार ६६३ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे मंगळवारी रात्री पैठण तालुक्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे येथील जायकवाडी धरणामध्ये सकाळी मोठी पाण्याची आवक वरील धरणातून येईल अशी शक्यता धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना व्यक्त केले आहे.

Back to top button