हिंगोली : बाभुळगावात येडोबा महाराज यात्रेला प्रारंभ; रखरखत्या विस्तवावर चालण्याची परंपरा कायम | पुढारी

हिंगोली : बाभुळगावात येडोबा महाराज यात्रेला प्रारंभ; रखरखत्या विस्तवावर चालण्याची परंपरा कायम

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा विदर्भातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बाभुळगाव येथील येडोबा महाराज यात्रेला रविवारी (दि.६) प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त धार्मिक विधी पार पडले. या मंदिरात माघ पौर्णिमेस नवस पूर्ण करण्यासाठी रखरखत्या विस्तवावर चालण्याची परंपरा अजुनही कायम आहे.

सेनगाव तालुक्यातील बाभुळगावात मध्यवस्तीत उंच टेकडीवर येडोबा महाराज मंदिर आहे. दरवर्षी लहाडी पौर्णिमेला श्री येडोबा महाराज यांच्या नावाने यात्रा भरविण्यात येते. या यात्रेला रविवारपासून (दि.५) प्रारंभ झाला आहे. रविवारी श्रींचा अभिषेक केल्यानंतर लहाडीची विधीवत पूजा करून लहाड पेटवण्यात आली. त्यानंतर अनेक भाविक नवस पूर्ण करण्यासाठी विस्तवावर चालले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कब्बडी आणि भव्य कुस्त्यांचे आयोजन केले होते.

हेही वाचा :

Back to top button