Latur : मांजरेच्या पुरात ५४ शेतकरी अडकले, बचावकार्य सुरू | पुढारी

Latur : मांजरेच्या पुरात ५४ शेतकरी अडकले, बचावकार्य सुरू

लातूर; पुढारी वृतसेवा: Latur येथील मांजरा नदीला आलेल्या पुराने सारसा येथील सुमारे ५४ शेतकरी त्यांच्या शेतात अडकले असून पूर वाढत असल्याने त्यांच्या बचावासाठी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत.

सकाळी ११ वाजल्यापासून बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत ३२ गावकऱ्यांना बोटीने सुखरुपस्थळी आणण्यात दलास यश मिळाले आहे. प्रवाहाचा वेग अधिक असल्याने बचाव कार्यात व्यत्यय येत असून विलंब होत आहे.

Latur येथील मांजरा नदीतील पुरात अडकलेल्यात दहा लहान मुले, महिलांसह पुरुषांचा समावेश होता असे बचाव पथकातील अग्निशमन जवान अनिकेत येरोळकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पुरांचा वेढा शेताना पडला असून शेकडोंवर गुरेही गोठ्यांनी अडकली आहेत. सुरक्षेच्या कारणावरुन त्यांना सोडून देण्यात आल्याचे येरोळकर म्हणाले.

असाच प्रसंग रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथील बंधाऱ्यावरील कर्मचाऱ्यावर ओढवला असून धरणाचे पाणी वाढल्याने व नदीला पूर आल्याने कर्मचारी अडकून पडले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button