मराठवाडा शिक्षक मतदारसंघ : कंधारमध्ये ८९.५० टक्के मतदान | पुढारी

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ : कंधारमध्ये ८९.५० टक्के मतदान

कंधार,पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी कंधारमधील चार मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ८७७ मतदारांपैकी ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ८६ महिलांचा समावेश आहे. ८९.५० टक्के एवढे मतदान झाले आहे.

राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे प्रा. किरण पाटील, मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, भाजपचे बंडखोर प्रा. नितीन कुलकर्णी, अंशतः अनुदानित शाळांचे मनोज पाटील यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत कंधार केंद्रात ४२२ मतदारांपैकी ३९३ (५२ महिला), पेठवडज केंद्रात १६० पैकी १३३ (११ महिला), कुरुळा केंद्रात १४३ पैकी ११७ (१० महिला) आणि उस्माननगर केंद्रात १५२ मतदारांपैकी १४२ मतदार (१२ महिला) एवढे मतदान झाले आहे.

अधिक वाचा :

Back to top button