धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी! करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल | पुढारी

धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी! करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल

केज; पुढारी वृत्तसेवा : आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. मंगळवारी (दि. २४) या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात करुणा मुंडे अणि अजय देडे यांच्याविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि. २३) रात्री ९:०० वाजताच्या सुमारास बालाजी तांदळे यांनी फेसबुकवर करूणा मुंडे यांचा एक व्हीडीओ पाहिला. या व्हिडिओमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त तांदळे यांनी करुणा मुंडे यांना फोन केला. यावेळी मुंडे यांनी तांदळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अजय देडे यांनी देखील बालाजी तांदळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी बालाजी तांदळे यांनी करुणा मुंडे- शर्मा ( रा. मुंबई) आणि अजयकुमार देडे ( रा. मुंबई) या दोघांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी (दि. २३) रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान केज पोलीस ठाण्यात दोघांविरोधातील दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button