औरंगाबाद : पैठण खुले कारागृहातील आजारी कैदयाचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : पैठण खुले कारागृहातील आजारी कैदयाचा मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयाचा गंभीर आजाराने मंगळवारी (दि.१६) मृत्यू झाला. दिलीप नरसिंग सोनवणे (वय ५०, रा. वसमत, जिल्हा परभणी) असे त्‍याचे नाव आहे. या घटनेची माहिती खुले कारागृह अधीक्षक कावळे यांनी दिली.

कैदी दिलीप सोनवणे याला पत्नीच्या मृत्यू प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. खुले कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी त्याला पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. खुले कारागृह अधीक्षक कावळे यांनी याबाबतची माहिती पैठण पोलीसांना दिली. आज (दि. १८) पैठण शासकीय रुग्णालयात सह न्यायाधीश अपर्णा सी. रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी पाहणी करून पंचनामा केला.

हेही वाचा :

Back to top button