परभणी : ब्राह्मणगावकडे जाणाऱ्या बाप-लेकास तिघांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

परभणी : ब्राह्मणगावकडे जाणाऱ्या बाप-लेकास तिघांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील बाप- लेकास जातीवाचक शिवीगाळ करून लाथ्या बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणगाव येथील अभय भाऊराव वावळे व त्याचे वडील भाऊराव वावळे हे दोघेजण दिनांक २९ डिसेंबर रोजी ब्राह्मणगाव फाटा येथून गावाकडे जात असताना आसाराम राजाराम जाधव, संजू पांडुरंग चव्हाण व मारुती पांडुरंग चव्हाण या तिघा जणांनी संगणमत करून रॉड शिवीगाळ करून लोखंडी रॉड आणि लाथ्या बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याबबातची फिर्याद अभय भाऊराव वावळे यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात दिली. त्या अनुषंगाने तिघा जणांविरुद्ध अनुसूचित जाती -जमाती संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जिंतूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी भेट देवून पाहणी केली. चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड हे तपास करीत आहे.

हेही वाचा : 

Back to top button