हिंगोली : शिरड शहापूर येथील उपसरपंचपदी संभाजी जोगदंड यांची बिनविरोध निवड | पुढारी

हिंगोली : शिरड शहापूर येथील उपसरपंचपदी संभाजी जोगदंड यांची बिनविरोध निवड

शिरड शहापूर; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील उपसरपंचपदी भाजपचे मिलिंद यंबल गटाचे संभाजी जोगदंड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच यशवंत रावले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उपसरपंचाची निवड करण्याचे ठरविले, उपसरपंच पदासाठी संभाजी जोगदंड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यावेळी भाजपाचे कार्याध्यक्ष मिलिंद यंबल यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निरीक्षक एस.बी. जोशी, विस्तार अधिकारी गिनगिने, मंडळ अधिकारी डी. डब्ल्यू. घुगे, तलाठी गोपाल मुकीर, ग्रामसेवक गुलाब काळे व पोलीस प्रशासन उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button