भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाणचे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार जाहीर | पुढारी

भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाणचे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार जाहीर

उमरखेड (नांदेड), पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार( कै), भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण तर्फे दिल्या जाणाऱ्या  राज्यस्तरीय कृषी गौरव  पुरस्काराची घोषणा डॉ, विजय माने यांनी केली.  शेती व्यवसायाशी संबधित राज्यात कार्यरत  २१ मान्यवरांना २०२३ सालचा हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी, कृषी उद्योजक, प्रसार माध्यमे व कृषी विद्यार्थी यांच्यात संवाद होऊन आधुनिक शेती व शेती करत असताना येणारे आव्हाने स्वीकारुन कृषी कार्यामध्ये प्रगती करण्यासाठी दरवर्षी लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या स्मृती दिनानिमित्त जानेवारी महिन्यात  दिले जाणारे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्याला उपाय म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठ अकोला यांनी २००६ पासून कृषी विज्ञान मंच या उपक्रमा अंतर्गत  प्रत्येक घटक आणि संलग्नीत कृषी महाविद्यालय व  कृषी तंत्र निकेतन मध्ये कृषी विज्ञान मंचची स्थापना करण्यात आली होती.

या अंतर्गत शेतकरी हितार्थ कार्य करण्यास नियोजित केले होते. त्या अनुशंगाने कृषी क्षेत्रात  सर्वात कमी खर्चाची व दररोज पैसे मिळण्याच्या महत्त्वपूर्ण कर्याबद्दल व कृषी योगदानाबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण, उमरखेड व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला च्या कृषी विज्ञान मंच या उपक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय, उमरखेड येथे गेल्या २० वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या  भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराची घोषणा कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शेतीमित्र अशोक वानखेडे व उपाध्यक्ष डॉ. गणेश जाधव यांनी केली.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व रोज पैसा प्राप्त करणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेती-पुरक व्यवसाय करणारे शेतकरी, कृषी संशोधक, कृषी तंत्रज्ञान विस्तारक, देशी गोवंश विकासक व सौरक्षक, वृक्ष संवर्धन व पर्यावरण, कर्तृत्वान शेतकरी महिला तसेच कृषी प्रसार माध्यमे -वृत्तपत्र – दुरचित्रवाणी- आकाशवाणी व इतर माध्यमाचे प्रतिनीधी असे कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे गटनिहाय निवड  करण्यात आली.

पुरस्कार्थी

(१)  डॉ. आनंद मुकेवार, नागपूर (आजीवन कृषी सेवा पुरस्कार)
(२)  डॉ. सतिष सुभाष निचळ, प्रा.दे.सं.केंद्र अमरावती (शास्त्रज्ञ पुरस्कार)
(३) डॉ. शाम मोतीराम घावडे, डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला ( शास्त्रज्ञ पुरस्कार)
(४) श्री रविशंकर सहस्त्रबुध्दे, पुणे (देशी गौवंश विकास पुरस्कार)
(५) डॉ. प्रशांत बबनराव नाईकवाडे, संगमनेर जि. अहमदनगर ( संद्रीय शेती-जागतीक अभ्यासक पुरस्कार)
(६) श्री संतोष देवराव गादे, टाकळी ता. शेवगांव जि. अहमदनगर. (कृषी उद्योजक  पुरस्कार)
(७) श्री अजिंक्य कोत्तावार, नागपूर. (हळद प्रक्रिया उद्योग पुरस्कार)
(८) श्री अभिजीत राजकुमार भांगे, कंदर ता. करमाळा जि. सोलापुर. (शेतमाल निर्यात हायटेक शेती पुरस्कार)
(९)  प्रा. शिवाजीराव मोरे, मु.पो. सोनखेड ता. लोहा जि. नांदेड. (पिक विमा अभ्यासक पुरस्कार)
(१०) श्री प्रविण रमेशराव देशमुख, जिल्हा प्रतिनीधी देशोन्नती, यवतमाळ (कृषी प्रसार-वृत्तपत्र पुरस्कार)
(११)  कृषी व गृह विभाग कार्यक्रम, आकाशवाणी केंद्र, यवतमाळ. (कृषी प्रसार-आकाशवाणी माध्यम पुरस्कार)
(१२)  श्रीमती अरुणा शिवाजी ताकतोडे, पोहंडूळ ता. महागांव जि. यवतमाळ. (कर्तुत्वान शेतकरी महिला पुरस्कार)
(१३) श्री रत्नदिप विठ्ठलराव धुळे, विडूळ ता. उमरखेड जि. यवतमाळ. (कृषी तंत्रज्ञान विस्तार पुरस्कार)
(१४) श्री मनोहर आनंद कापसे, पिंपळगांव ता. देवळा जि. नाशिक  (कुकूट पालन पुरस्कार)
(१५) श्री प्रतिभा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. माळेगांव ता. बारामती जि. पुणे. (फार्मर्स प्रोड्युसर  कंपनी पुरस्कार)
(१६)  श्री राजाराम विठ्ठल चौधरी, शिरोली (बु.), जुन्नर जि. पुणे. (फुलशेती पुरस्कार)
(१७) श्री मुकूंद तात्याबा पिंगळे, राज्य कृषी पत्रकार- अँग्रो वन नाशिक. (कृषी प्रसा-वृत्तपत्र पुरस्कार)
(१८) श्री सुरेंद्र ज्ञानेश्वर राऊत, वृत्त प्रतिनीधी- लोकमत,यवतमाळ. (कृषी प्रसार-वृत्तपत्र पुरस्कार)
(१९)  सौ. स्वप्ना अतुल देशमुख, सरपंच ग्रा.पं. परसोडा  ता. आर्णी जि. यवतमाळ. (वृक्ष संवर्धन व पर्यावरण पुरस्कार)
(२०) श्री मोहन रामचंद्र गायकवाड, मु. पवना ता. हिमायतनगर जि. नांदेड. (दुग्ध उत्पादक पुरस्कार)
(२१) श्री. सुनिल विठ्ठलराव पावडे, रा. ब्राम्हणवाडा ता. नेर जि. यवतमाळ. (रेशीम उद्योग पुरस्कार)

.हेही वाचा 

जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात

बेळगाव : ऊस दरापेक्षा खुशालीचा दर भडकला

रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांचा ‘ताप’

Back to top button