जालना : राज्यपालांच्या निषेधार्थ घनसावंगी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

जालना : राज्यपालांच्या निषेधार्थ घनसावंगी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

घनसावंगी: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. जनभावनांचा विचार करून राज्यपालांना तत्काळ पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या घनसावंगी बंदला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी घनसावंगी आणि परिसरातील शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींच्या वतीने बंदला सहकार्य मिळाले. बुधवारी आठवडी बाजार असल्याने शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेता गुरुवारी कुंभार पिंपळगाव बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. छोटे व्यापारी, विद्यार्थी, यांची गैरसोय होऊ नये, म्हणून गुरूवारी बंद पाळण्यात येणार असल्याचे कु. पिंपळगाव व्यापारी महासंघाच्या वतीने कळवले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button