बीड : पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडला

बीड, पुढारी वृत्तसेवा : विनयभंगाच्या गुन्ह्यातील तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यापैकी 15 हजारांची लाच स्विकारताना शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचार्यास सोमवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास बसस्थानकासमोरील हॉटेलात रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद येथील एसीबीच्या टिमने केली.
तक्रारदाराला विनयभंगाचा गुन्ह्यामधील आरोपीकडून 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील दहा हजार रुपये तक्रारदाराकडून यापुर्वीच आरोपींनी घेतलेले आहेत. तर उर्वरित 15 हजाराची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर या दोघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील बसस्थनका समोरील हॉटेलात करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने केली आहे. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.