परभणी : लव्‍ह जिहाद, धर्मांतरण विरोधात कायद्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा | पुढारी

परभणी : लव्‍ह जिहाद, धर्मांतरण विरोधात कायद्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा

जिंतूर (परभणी), पुढारी वृत्तसेवा : राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी जिंतूर शहरात आज ( दि. ४ ) हिंदू समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. उदगीर येथील भागवतांचार्य साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली, आचार्य महेशानंद महाराज, व बालिकांसह मोर्चात सहभागी झाले.

दिल्लीत आफताब पुनावाला याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा हिची अमानूष हत्‍या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हे प्रकरण तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आले आहे. आरोपी आफताब पुनावाला यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशात सर्वत्र लागू करण्यात यावा. यासाठी आज रविवारी शहरातील येलदरी रस्त्यावरील संत श्री भगवानबाबा चौकातून जिल्हा परिषद प्रांगना पर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात तालुक्यातील हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील जिल्हा परिषद मैदानावर एकत्र जमून हिंदू समाज बांधवांच्या वतीने तहसील प्रशासना मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या वतीने धारकरी, तसेच बालिकांनी फेटेच्या वेशात, व मोठ्या संख्येने महिला, पुरुष या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button