परभणी : मॉर्निंग वॉक बेतले जिवावर; व्यापाऱ्याला अज्ञात वाहनाने चिरडले | पुढारी

परभणी : मॉर्निंग वॉक बेतले जिवावर; व्यापाऱ्याला अज्ञात वाहनाने चिरडले

मानवत(परभणी), पुढारी वृत्तसेवा : मानवत येथे पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय नागरिकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्‍याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रामेटाकळी रस्त्यावर घडली. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, शांतीलिंग नरहरिआप्पा व्यवहारे असे मयत नागरिकाचे नाव असून ते रामेटाकळी येथे तेलाचा व्यवसाय करीत होते. शनिवारी पहाटे ५:३०- ६ च्या सुमारास रामेटाकळी ते हमदापूर या राज्य रस्त्यावर रोजच्या प्रमाणे फिरावयास गेले होते. या वेळेस पोखर्णीकडून पाथरीकडे वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना उडवले.

यामध्ये त्‍यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी मॉर्निंग वॉकला असलेल्‍या काही नागरिकांनी त्यांच्या घरी माहिती देत त्यांना उपचारासाठी परभणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला.

अपघातात दिवसेंदिवस वाढ

परभणी ते मानवतरोड या रस्त्याची दुरवस्था झाल्याने परभणीहून पाथरीकडे जाणारे अनेक वाहने हे रामेटाकळी मार्गे जात असल्याने मोठी वाहतूक या रस्त्यावर वाढली आहे. त्‍यामूळे अपघाताच्या घटनाही मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. या अपघातात यापूर्वीही अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे स्‍थानिक नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा 

रायगड : मोलकरणीचा सव्‍वा तीन लाखांच्‍या दागिन्‍यांवर डल्‍ला

वडगाव मावळ : भाजपने केला राष्ट्रवादीच्या मदतीने राष्ट्रवादीचाच गेम !

जालना शहरात शिवजागर; राज्‍यपालांना पदमुक्‍त करण्याची मागणी 

Back to top button