उस्मानाबाद : वर्गखोल्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्धार | पुढारी

उस्मानाबाद : वर्गखोल्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्धार

उस्मानाबाद; पुढारी वृतसेवा : वाशी तालुक्यातील घोडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली असून ही शाळा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनली आहे. यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा एक निर्धार केले आहे. त्यामुळे मगंळवार पासून शाळा बंद असल्याचे पहायला मिळाले.

घोडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सन 1954 साली स्थापन झालेली आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. यात एकूण 133 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदरील शाळेची जागा 42 आर. असून त्यापैकी शेतकऱ्यांचा 15 आर. जागेसाठी न्यायालयात दावा सुरू आहे. या जागेविरुद्ध 2014 साली या शेतकऱ्यांनी कोर्टात अपील केली होती. तेव्हापासून शाळेच्या दुरुस्ती, देखभाल यासाठी शासनाचा कुठलाही निधी येत नाही. तसेच या शाळेच्या जुन्या खोल्यांना तडे गेले आहेत. हे जुने बांधकाम कधी पण पडेल या भितीने या गावच्या पालकांनी मंगळवार (दि.22नोव्हेंबर) पासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला आहे.

शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या शाळेच्या जागेसाठीचा दाव्या संबंधीचा कुठलाही निकाल किंवा सक्षम कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा घोडकी येथील विध्यार्थ्यांच्या पालकांनी जोपर्यंत वर्ग खोल्याचे दुरुस्तीकरण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही यावर पालक ठाम असल्याच्या आशयाचे निवेदन उस्मानाबादचे मुख्यकार्यकारी अधिकारी, वाशीचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन चौकशी करुण जुन्या इमारतमध्ये शाळा न भरवण्याचे आश्वासन दिले होते. पण, पालक शाळा न भरविण्यावर ठाम आहेत . तरी शाळेतील विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे, याला जबाबदार कोण असा सवाला उपस्थित होत आहे.

” शाळेची जुनी इमारत खराब झाली आहे. त्याचे नवीन बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार करुन जि.प सादर केले आहे. तो पर्यंत पत्र्याच्या शेडची फरशी व इतर किरकोळ दुरुस्ती करण्याये ग्रामपंचायतील आदेश दिले आहेत. मुलांचे शाळेचे नुकसान होऊ नाही म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवण्याची पालकांना विनंती केली होती.”
– नामदेव राजगुरु, गटाविकास अधिकारी, पंचायत सतिती, वाशी.

Back to top button