बीड: शेतात पाणी देताना सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

बीड: शेतात पाणी देताना सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निपाणी जवळका येथील एका शेतकऱ्याचा सर्पदंश होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१८) रात्री घडली. रामेश्वर भागवत लोकणकर (वय ३५, रा. निपाणी जवळका) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार रात्री रामेश्वर आपल्या शेतात ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी त्‍यांना विषारी सर्पाने दंश केला.  रामेश्वरला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औंरगाबाद येथे हलवण्यात आले. मात्र, आज (दि.१९) उपचारादरम्यान रामेश्वरचा मृत्यू झाला.

हेही वाचा :  

Back to top button