औंढा नागनाथः पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ शहरात 'जश्न-ए-ईद-मिलादून्नबी' निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामील झाले होते. पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ठिकठिकाणी अन्नदान व धार्मिक जागरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. रविवारी सकाळी १० वाजता ज'जश्न-ए-ईद-मिलादून्नबी'निमित्त रहीम चौक येथून मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक नगरपंचायत रोड, सोनार गल्ली, शिवाजी चौक, डॉ. खतीब चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने काढण्यात आली. नगरसेवक अज्जु ऊर्फ आसेफ इनामदार, अजिज कादरी, शफि नदाफ, रफिक कुरेशी यांच्यासह शफी इनामदार, जुनेद बाबा, गौस कुरेशी, साहेबमिया खतीब, शहाबुद्दीन रजा, मुखतदिर रजा, आक्रम खतीब, नाजेम रजा, अरबाज रजा, मुर्शर्रफ कादरी, सिद्धीक इनामदार, मझहर , मोईन कादरी, शकील अहमद, शफीक पठाण, सलमान पठाण आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे- पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शांततामय वातावरणामध्ये जश्न ए ईद मिलादुन्नबी निमित्ताने काढलेली मिरवणूक पार पडली.
हेही वाचलंत का ?