परभणी: धावत्या जीपमधून उड्या मारल्यामुळे तीन विद्यार्थीनी गंभीर जखमी | पुढारी

परभणी: धावत्या जीपमधून उड्या मारल्यामुळे तीन विद्यार्थीनी गंभीर जखमी

बोरी (परभणी), पुढारी वृत्तसेवा : रिडज गावाहून बोरीकडे येत असताना जीप जिंतूरकडे वळत असल्याने घाबरलेल्या दहावीच्या तीन विद्यार्थीनींनी त्या धावत्या जीपमधून उड्या घेतल्‍या. यामध्ये त्या तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरूवारी (दि.6) सकाळी साडेसात वाजता घडली.

रिडज गावातील विद्यार्थिनी दहावीच्या शिक्षणासाठी बोरी येथे जातात. गुरूवारी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता दहा विद्यार्थीनी बोरीसाठी निघाल्या होत्या. त्या गावातून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या एका बोलेरो जीपमध्ये (एम.एच.04सी.आर.0329) बसल्या होत्या. त्यांना बोरीसाठी चांदज पाटीवर उतरावयाचे होते. परंतू जीपचालकाने ही गाडी जिंतूरकडे वळवल्याने त्यातील तीन मुलींनी घाबरून जावून धावत्या जीपमधून खाली उड्या मारली. त्या तिघीही गंभीर जखमी झाल्या. मनिषा रामप्रसाद खापरे, दिपाली सुरेशराव मुटकूळे व मेघना ज्ञानोबा शेवाळे अशी या जखमी मुलींची नावे होत. त्यांना तातडीने बोरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन विद्यार्थीनींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मेघना शेवाळे या विद्यार्थीनीवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी जीपचालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. चालकावर कठोर कारवाई करण्यता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

केजरीवाल यांची नायब राज्यपालांवर टीका; इतके तर मला पत्नी देखील रागावत नाही  

ठाणे : आपत्कालीन वाहिकेचे सराव प्रात्यक्षिक, दुर्घटना टाळण्यासाठी कामाचे लक्षवेधी पाऊल 

नांदेड : कार-दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार

Back to top button