नांदेड : कार-दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार | पुढारी

नांदेड : कार-दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार

उमरी, पुढारी वृत्तसेवा : उमरी-कारेगाव मार्गावर कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर या  दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. साहेबराव केरबा यमलवाड (वय ३८) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (दि.६) सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.

उमरी – कारेगाव राज्यमार्ग दरम्यान,तालुक्यातील गोळेगाव येथील तरुण साहेबराव यमलवाड हा गावातील दुर्गा विसर्जनासाठी उमरीकडे निघाला.त्याचवेळेस विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची आणि यमलवाड याच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार साहेबराव यमलवाड हा जागीच ठार झाला. तर दोनजण गंभीर जख्मी झाला आहे. धडक एवढी जोराची होती की,कारच्या दोन्ही एअर बॅग बाहेर निघाल्या. घटनेदरम्यान त्या रस्त्यावरून येणारे उमरी नगरपरिषदेंचे कार्यालयीन वरिष्ठ लिपिक गणेश मदने यांनी घटनेची माहिती उमरी पोलिस स्टेशनला देवून जख्मीना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचलंत का?

Back to top button