अंबाजोगाई : पुर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी | पुढारी

अंबाजोगाई : पुर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने  सोमवारी रात्री ८ वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापूजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापूजा झाली. अप्पर जिल्हाधिकारी सौ. मंजुषा मिसकर व त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी श्री.योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या महापूजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. सोमवारी सायंकाळी मंदिरात पुर्णाहुती व होमहवन होऊन महापूजा झाली.

अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर व त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी श्री.योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या महापूजेसाठी देवल कमिटीचे सचिव अँड. शरद लोमटे, मुख्यपूजारी सारंग पुजारी. विश्वस्त भगवानराव शिंदे, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा, कमलाकर चौसाळकर, उल्हास पांडे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा.अशोक लोमटे, संजय भोसले, पूजा राम कुलकर्णी, गौरी जोशी, श्रीराम देशपांडे, पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते.

गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दूरदूर ठिकाणाहून लोक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना विविध सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button