हिंगोली : वसमत येथे तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

हिंगोली : वसमत येथे तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वसमत; पुढारी वृत्तसेवा : वसमत शहरातील कौठा रोडवरील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंदाजे २२ वर्षीय तरुणाचा  मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

वसमत येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंदाजे २२ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या आवस्थेत मृतदेह आढळला आहे. सय्यद असलम सय्यद सरफराज ( वय २२ रा. बुखारी तकीया) असे मृत तरुणाचे नाव आहे.  घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे ,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम ,पोउनि बाबासाहेब खार्डे, सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाशेजारी आधार कार्ड सापडल्याने मृताची ओळख पटली असल्याचे शहर पोलीसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

 

Back to top button