बीड : पीएफआयचे बीडमधील कार्यालय सील; जिल्हा अध्यक्षासह एकाला ३ ऑक्टोंबरपर्यंत कोठडी

बीड : पीएफआयचे बीडमधील कार्यालय सील; जिल्हा अध्यक्षासह एकाला ३ ऑक्टोंबरपर्यंत कोठडी
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर बुधवारी रात्री बीडमधील पीएफआयचे कार्यालय महसूल विभागाने सील केले.  दरम्यान, बीड शहर पोलिसांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह अन्य एकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन सुनावली आहे.

पीएफआय संघटनेच्या बीड येथील माजी जिल्हाअध्यक्षाला एटीएसने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीडमध्ये संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घालताच बीड शहर पोलिस स्टेशनचे रवी सानप व सहकाऱ्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोज मोमीन व कामरान खान यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन सुनावली आहे. बीड शहरातील जुना बाजार भागातील संघटनेचे कार्यालय महसूल विभागाने सील केले. यावेळी तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news