हिंगोली : पोलिसांकडून २ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

हिंगोली : पोलिसांकडून २ लाखांचा गुटखा जप्त

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा सुंगधीत गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असलेले वाहन शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी आसेगाव रोड पाँईट येथे पकडली असून कारसह रु अंदाजे २,७१,३६० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व वेगवेगळ्या कंपनीचा सुंगधीत गुटखा व्रिकीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. गुटखा हा मानवीय स्वास्थ्यासाठी विषारी घटक आहे हे माहीत असताना सुध्दा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने वरील वर्णनाचा प्रतिबंधीत २,७१,३६० रुपयाचा गुटका व वाहन असा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस हवालदार शेख नय्यर यांच्या फिर्यादीवरुन सुनील लक्ष्मण सदावर्ते (वय २६) याच्या विरुद्ध विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बोराटे करीत आहेत.

हेही वाचा;

Back to top button