उद्धव ठाकरेंची भाषा कशी बदलली : भावना गावळी | पुढारी

उद्धव ठाकरेंची भाषा कशी बदलली : भावना गावळी

वाशीम, पुढारी वृत्‍तसेवा : शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावना गावळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना राखी बांधली यावरून टीका केली होती. यावर भावना गवळी यांनी उत्तर दिले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली, म्हणून मी त्यांची साथ दिली. आता उद्धव ठाकरे यांची भाषा कशी बदलली असा सवाल देखील खासदार भावना गवळी यांनी यावेळी केला. 

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार भावना गवळी म्हणाल्या, काल मी त्यांची ताई होती, आज बाई झाले. रक्षा बंधन सारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदार संघातील एक लाखापेक्षा जास्त बांधवाना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली. 

बुधवारी मुंबई येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनापक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना गवळी यांच्यावर टीका करत म्हणाले होते “मला पंतप्रधानांचे आश्चर्य वाटते स्वतःच्याच पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केलेत, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. तुम्हाला या सव्वा दीड कोटी लोकसंख्येमध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला, भ्रष्टाचाराचे आरोप केल्या नंतर निदान खरं खोटं काय ते बघून घ्या, भाजप ने काय माणसं धुवायची लॉंड्री काढली आहे काय ?”

हेही वाचा  

उल्हासनगर : मानस टॉवर इमारतीचा स्लॅब कोसळला; चार जणांचा मृत्यू

औरंगाबाद : दोन वर्षांच्या खंडानंतर भरणार कर्णपुरातील तुळजाभवानीची यात्रा; ३५० वर्षांची परंपरा

माहूर गडावर शारदीय नवरात्रौत्सव आढावा बैठक संपन्न

Back to top button