लातूर : अन्न सुरक्षा योजनेतील धान्य दोन वर्षांपासून दुकानदारांकडे धूळखात? | पुढारी

लातूर : अन्न सुरक्षा योजनेतील धान्य दोन वर्षांपासून दुकानदारांकडे धूळखात?

चाकूर; संग्राम वाघमारे :  कोणताही गरीब वर्ग उपाशी राहू नये यासाठी कोरोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण
अन्न योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली परंतु या योजनेतील गरीब लाभार्थ्यांना दुकानदारांच्या चुकीमुळे चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातील पाच गावांतील अन्न सुरक्षा योजनेतील आठ धान्य दुकानदारांच्या
अज्ञानपणामुळे गरीब लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले नाही. ऑक्टोबर 2020 चे धान्य दुकानदारांकडे दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. याला जबाबदार कोण ? अशी चर्चा मोठ्या चवीने होत आहे.

धान्य दुकानदारांचा अज्ञानपणा अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांच्या मुळावर आल्याने ही योजना अद्याप तरी कागदावरच असून तालुक्यातील पाच गावांतील आठ दुकानदारांकडील हजारो लाभार्थी वंचित राहिल्याची
माहिती उघड झाली आहे. चाकूर तालुक्यातील अलगरवाडी, नागेशवाडी,सुगाव येथील 3 दुकाने, शिवणखेड येथील 2 दुकाने,हटकरवाडी या गावातील गरीब लाभार्थ्यांना धान्य न मिळाल्याने चांगलाच फटका बसलेला आहे. संबंधित दुकानदारांकडे ऑक्टोबर 2020 चे तब्बल दोन वर्षांपासूनचे धान्य सुरक्षित आहे किंवा नाही असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा धान्य दुकानदारांकडून गोंधळ उडविला जात आहे. नियोजित व मुदतीत
धान्य वितरण न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.त्यामुळे ऑक्टोबर 2020 महिन्याचे धान्य वाटप राहिले असून पाच गावातील आठ दुकानदारांकडील हजारो लाभार्थी त्यापासून वंचित राहिले आहे. शासनाचे धोरण वेळेत धान्य पुरवठा झाला पहिले असे आदेश आहेत परंतु येथील धान्य दुकानदारांचा कारभार लाभार्थ्याच्या अंगलट आल्याने ऑक्टोबर 2020 चे धान्य वाटपाविनाच दुकानदारांकडे धूळखात पडून असल्याने ते धान्य संबंधित पाच
गावातील लाभार्थ्यांना मिळावे, अशी मागणी वंचित लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

शासनाने परवानगी व मशिनवर डाटा उपलब्ध झाल्यानंतर सदरील गावातील लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. शिल्लक धान्य दुकानदारांकडे असून वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे.ऑफलाईन धान्य वाटप करण्यास शासनाकडून परवानगी नाही.
– डॉ. शिवानंद बिडवे,
तहसीलदार चाकूर.

Back to top button