औरंगाबाद: नाथसागर धरणातून ६६ हजार क्युसेक विसर्ग सुरु | पुढारी

औरंगाबाद: नाथसागर धरणातून ६६ हजार क्युसेक विसर्ग सुरु

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणामध्ये शुक्रवारी (दि.९) सायंकाळी सातच्या सुमारास ७० हजाराहून अधिक क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाथसागर धरणातून ६६ हजार ०२४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे साडेतीन फुटाने उघडण्यात आले आहेत.

शुक्रवारी दिवसभर पाण्याची आवक नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणावर जमा होत असल्याने नाथसागर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणात ९८.६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १८ दरवाजातून गोदावरी नदीमध्ये ६६ हजार ०२४ विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. रात्री धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button