नांदेड : ढवळे कॉर्नर परिसरात वाईन शॉप मॅनेजरचा खून

वाईन शॉप मॅनेजरचा खून
वाईन शॉप मॅनेजरचा खून
Published on
Updated on

नांदेड; पुढारी वृत्‍तसेवा : नांदेडच्या ढवळे कॉर्नर येथे माजी नगरसेवक संदीप चिखलीकर यांचे प्रदीप वाईन शॉप आहे. या वाईन शॉप मध्ये चिखलीकर यांचे नातेवाईक माधव जीवनराव वाकोरे काटकळंबेकर (वय 30) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. वर्दळीचा भाग असलेल्या या वाईन शॉप मध्ये १ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक माधव वाकोरे यांच्याशी काही तरुणांनी वाद घातला. त्यानंतर एक तासाने काही तरुण तेथे आले व त्यांनी माधव वाकोरे यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये वाकोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्‍यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत टासले, उपनिरीक्षक अनिल बिच्चेवार आदींनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके नेमण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दि. २ सप्टेंबर रोजी मृत माधव वाकोरे यांच्या पार्थिवावर काटकळंबा ता. कंधार येथे सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. मृत माधव वाकोरे यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news