नांदेड : माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन | पुढारी

नांदेड : माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन

उमरी (जि. नांदेड) : पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार श्रीनिवासराव उर्फ बापूसाहेब बाळाजीराव देशमुख गोरठेकर (वय ७९) यांचे बुधवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी उपचारादरम्यान नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना किडनीचा त्रास होत असल्याने हैदराबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यामध्ये प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना हैदराबादहून नांदेड येथे आणण्यात आले होते.

नांदेड येथे अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दि. २४ रोजी परत दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातू, नात असा परिवार आहे. त्याचा राजकीय प्रवास गोरठा सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सभापती, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार असा झाला. २००४ ते २००९ भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मधून नेतृत्व केले होते. मतदारसंघ बदलल्याने तसेच उमरी, धर्माबाद तालुके नायगाव विधानसभा क्षेत्रात गेल्याने मागील विधानसभा त्यांनी लढवली नव्हती.

Back to top button