जालना : वडीगोद्रीत जोरदार पाउस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ | पुढारी

जालना : वडीगोद्रीत जोरदार पाउस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

वडीगोद्री (जालना) ; पुढारी वृत्तसेवा :  जालना येथील वडीगोद्रीत जोरदार पाउस झाला आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री व शहागड परिसरातील पा धुव्वाधार पावसामुळे अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील लेंडी नदीला पूर आला आहे. चंदनापुरी, रेणापूरी, दह्याळा, भांबेरी या गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी नदी पात्रातील पैठण तालुक्यातील हिरडपुरी उच्च पातळी बंधारा हा ९१.६० % भरला आहे. या बंधाऱ्यातून १२ हजार क्यूसेकने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्राच्या मध्यभागी असलेले पांचाळेश्वर मंदिर पाण्यात गेले आहे. जालण्यातील वडीगोद्रीत जोरदार पाउस झाल्‍याने अनेक नद्यांना पूर आला आहे.

जोरदार पावसामुळे अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द बंधारा हा पूर्णपणे भरला आहे. या बंधाऱ्याचे तीन गेट २ मीटरने उचलण्यात आले आहे.

शेती शिवारात पाणीच पाणी ; पिकांचे अतोनात नुकसान

वडीगोद्री व शहागड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, या  परिसरात विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना शेतातून सुट्टी जरी मिळाली असली, तरी या पावसामुळे शेती शिवारात पाणी साचले असून ऊस, कापूस, सोयाबीन, बाजरी पिकात पाणीच पाणी झाले आहे. काढणीस आलेला मूग ही पाण्यात गेल्‍याने नुकसान झाले आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button