राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले श्री वैद्यनाथाचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले श्री वैद्यनाथाचे दर्शन

Published on

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (दि.१९) बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अंबाजोगाईत त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेड क्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली. योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी वैजनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. राज्यपालांचा आजचा मुक्काम परळी वैजनाथ येथेच असणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशारी आज अंबाजोगाई येथून दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास परळीत दाखल झाले. ४.२० वाजता त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दाखल होत श्रावण पर्वकाळात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने वैद्यनाथाची प्रतिमा देऊन राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेश देशमुख, प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नंदकिशोर जाजू, नागोराव देशमुख, रघुवीर देशमुख, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news