औरंगाबाद : भवानीनगरात टोळक्याची तुफान दगडफेक | पुढारी

औरंगाबाद : भवानीनगरात टोळक्याची तुफान दगडफेक

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा :  घरासमोरील ओट्यावर बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून टोळक्याने भवानीनगरात तुफान दगडफेक केली. तुफान दगडफेक झाल्‍यामुळे दोन गट समोरासमोर आले. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.

ओट्यावर बसण्‍यास मज्‍जाव केल्‍याने कृत्‍य

गल्ली नं. ६ येथे दादा कॉलनीतील काही टवाळखोर ओट्यावर बसून सिगारेट ओढत महिलांची छेड काढत होते. यावर त्यांना बसण्यास मज्जाव केला असता टोळक्याने दगडफेक करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात प्रचंड तणाव असल्याने पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक मनोज बल्लाळ, राजेश जाजू, बळीराम देशमाने, विकास लूटे, अशोक महानोर, गणेश काथार, करण कपूर आदी उपस्थित होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस प्रशासनाला तत्काळ दखल घेण्याची सूचना केली.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button