बीड : तळणेवाडी येथे हाणामारीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू | पुढारी

बीड : तळणेवाडी येथे हाणामारीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उमापूर रोडवरील तळण्याचीवाडी येथे दोन गटात १२ ऑगस्ट रोजी तुंबळ हाणामारी झा  झाल्या होत्या. या घटनेत नामदेव ढेंबरे (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाण केलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी गावातील शेकडो तरुणांनी नामदेव याचा मृतदेह थेट गेवराई पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला होता. रात्री उशिरा याप्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही उशिरापर्यंत पोलीस गुन्हा नोंद करत नसल्यामुळे गेवराई पोलीस स्टेशन परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक जंवजाळ व  उपनिरीक्षक बोडखे यांनी तरुणांची समजूत काढत पुढील कारवाई सुरु केली. यानंतर रात्री उशिरा या मारहाण प्रकरणातील पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button