बीड : १५ ऑगस्टपासून परळी -मिरज एक्स्प्रेस पुन्हा सुरू होणार | पुढारी

बीड : १५ ऑगस्टपासून परळी -मिरज एक्स्प्रेस पुन्हा सुरू होणार

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा: परळी – मिरज रेल्वे एक्स्प्रेस प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 मध्ये बंद केली होती. ती तब्बल 2 वर्ष 5 महिन्यानंतर 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही रेल्वे पूर्ववत सुरु होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मिरज-परळी एक्स्प्रेस आणि परळी-मिरज एक्स्प्रेस पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे विशेषतः परळी व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. परळी रेल्वे स्टेशनहून सध्या रेल्वे गाड्या धावत आहेत. आता परळी -मिरज गाडीची त्यात भर पडणार आहे. परळी-मिरज ही रेल्वे गाडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.

परळी -मिरज रेल्वे परळीहून पूर्ववत सुरू करावी, याकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खा. प्रीतम मुंडे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, रेल्वेचे अधिकारी उदय भगरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यााबाबत पाठपुरावा केला होता.

अशी धावेल रेल्वे…

रेल्वे क्रमांक 11412  ही 15 ऑगस्टपासून 21.00 वाजता मिरजहून सुटेल आणि 06.10 वाजता परळीला पोहोचेल आणि ट्रेन क्रमांक 11411 ही 16 ऑगस्टपासून परळीहून 07.25 वाजता सुटेल आणि 17.55 वाजता मिरजला पोहोचेल. तर परळीहून मिरजगाडी घाटनांदूर, पानगाव, जानवळ, वडवळ नागनाथ,   कारेपूर,  लातूर रोड, लातूर, ढोकी येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, धालगाव मार्गे मिरजला जाईल. दरम्यान, वडवळ नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनांदूर स्टेशनवर गाडी थांबेल. या ट्रेनमध्ये 10 जनरल डबे असतील.

हेही वाचलंत का ? 

Back to top button