मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्योतिर्लिंग नागनाथाचे दर्शन | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्योतिर्लिंग नागनाथाचे दर्शन

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाची पूजाभिषेक करून दर्शन घेतले. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी रात्री साडेदहा वाजता शिंदे औंढा नागनाथ येथे आले होते. यावेळी त्यांचा नागनाथ संस्थानकडून शाल श्रीफळ पुष्पहार घालून व नागनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, संस्थांन अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button