औरंगाबाद : पाटेगाव येथील गोदावरी नदीत बुडालेल्या 'त्या' तरुणाचा शोध अखेर लागला | पुढारी

औरंगाबाद : पाटेगाव येथील गोदावरी नदीत बुडालेल्या 'त्या' तरुणाचा शोध अखेर लागला

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील तरूणाचा अखेर शोध लागला. अग्निशामक दलाच्या जवानांनी  बुडालेल्या प्रवीण पवार या युवकाचा तीन दिवसांनी मृतदेह शोधून काढला. पाटेगाव येथील प्रवीण भगवान पवार (वय ३५ ) हा युवक गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात पडल्याची घटना दि.३१ जुलै रोजी घडली होती. तेव्हापासून तहसीलदार दत्तात्रय निलावाड व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद पैठण येथील अग्निशमन दलाच्या दहा जवानाकडून शोध कार्य सुरू होते.

तीन दिवस उलटले तरीही सदरील युवकाचा शोध न लागल्यामुळे संताप्त नातेवाईकांनी गोदावरी नदीच्या काठावर आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी अग्निशमन दलाच्या जवानांकडून नदीत युवकाचे शोध कार्य करीत असताना सकाळी आठ वाजता वडवळी परिसरातील गोदावरी नदीमध्ये प्रवीण पवार यांचा मृतदेह आढळून आला.

पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा झाल्यानंतर मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली आहे.

  हेही वाचलंत का? 

 

Back to top button